Join us

Urmila kothare Birthday Special: असे केले होते आदिनाथ कोठारेने उर्मिलाला प्रपोज, वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 12:56 PM

उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असून एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे.

ठळक मुद्देशुभ मंगल सावधान या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते.

अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. उर्मिलाचा आज वाढदिवस असून ती लवकरच एकदा काय झालं या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे. उर्मिलाच्या मुलीच्या जन्मानंतर तिने अभिनयक्षेत्रातून काही काळाचा ब्रेक घेतला होता. पण तिच्या कमबॅकमुळे तिचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.

उर्मिलाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे सोबत झाले असून त्यांना जिजा ही मुलगी आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची ही जोडी खूपच आवडते. तुम्हाला माहीत आहे का, उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांना तो या चित्रपटासाठी असिस्ट करत होता.

या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली होती. तेव्हा आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले.

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेआदिनाथ कोठारे