आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता अशाच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चर्चेत आला आहे.
90 च्या दशकातील अभिनेत्रींचा उल्लेख केला जातो, तेव्हा या अभिनेत्रीचे नाव नक्कीच घेतले जाते. उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्यामुळे तिने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. या मुलीने वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी बालकलाकार म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली, परंतु एका निर्णयाने तिचं करियर उद्ध्वस्त झालं. तिने अभिनयासोबतच राजकारणातही हात आजमावला आहे.
निरागस चेहरा, मोठे डोळे आणि सुंदर हास्य असलेली ही मुलगी तुम्हाला ओळखता आली आहे का? ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडमध्ये ‘छम्मा छम्मा’ आणि ‘रंगीला गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आहे. हा फोटो 1977 च्या काळातील आहे. जेव्हा वयाच्या 3 व्या वर्षी बीआर चोप्रा यांच्या कर्मा चित्रपटासाठी तिला कास्ट करण्यात आले होते. बाल कलाकार म्हणून उर्मिला मातोंडकरने कलयुग ते मासूमपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले.
वर्षानुवर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर उर्मिला मातोंडकरने 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. 2019 ची लोकसभा निवडणूकही तिने उत्तर मुंबईतून लढवली होती, पण तिचा पराभव झाला होता. उर्मिला मातोंडकरही तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 2016 मध्ये उर्मिलाने तिच्याहून नऊ वर्ष लहान असलेल्या मॉडेल आणि व्यावसायिक प्रियकर मोहसिन मीर अख्तरशी लग्न केलं.
गेल्या अनेक वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. स्वतःचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. उर्मिलाने फक्त हिंदीच नाही तर अनेक मराठी तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे.