Join us

उर्मिला मातोंडकरचे पती मोहसिन अख्तर मीर आहेत पाकिस्तानी? सोशल मीडियावर सुरू आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 5:26 PM

उर्मिला सोबत प्रचारात आपल्याला तिचे पती मोहसिन अख्तर यांना पाहायला मिळत आहे. पण उर्मिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्याविषयी सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत.

ठळक मुद्देमोहसिन अख्तर हा काश्मीरचा असून त्याचे संपूर्ण कुटुंब हे अनेक वर्षांपासून तिथेच राहात असल्याचे म्हटले आहे. मोहसिन हा काश्मिरचा असला तरी तो वयाच्या २१ व्या वर्षापासून मुंबईत राहात आहे.

उर्मिला मातोंडकरला बॉलिवूडची रंगिला गर्ल म्हटले जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण उर्मिला गेल्या काही वर्षांपासून लाइमलाईटपासून दूर आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली नव्हती. पण सध्या उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्मिला मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. सध्या ती तिचा जोरदार प्रचार करत आहे. मुंबईच्या रस्त्यावरून फिरताना तिला पाहायला मिळत आहे. 

उर्मिला सोबत प्रचारात आपल्याला तिचे पती मोहसिन अख्तर यांना पाहायला मिळत आहे. पण उर्मिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्याविषयी सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. तिने लग्न करताना इस्लाम धर्म स्वीकारला असून तिचे नाव आता मारिया अल्टर मीर असल्याचे पोस्ट व्हायरल होत आहेत. एवढेच नव्हे तर तिचे पती मोहसिन हे पाकिस्तानी असल्याचे मेसेजेस सोशल मीडियावर एकमेकांना पाठवले जात आहेत. 

उदयपूर किरण या वेबसाईटने याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी मोहसिन अख्तर हा काश्मीरचा असून त्याचे संपूर्ण कुटुंब हे अनेक वर्षांपासून तिथेच राहात असल्याचे म्हटले आहे. मोहसिन हा काश्मिरचा असला तरी तो वयाच्या २१ व्या वर्षापासून मुंबईत राहात आहे. अभिनेता बनण्यासाठी तो मुंबईत आला होता. त्याने २००७ मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेत देखील भाग घेतला होता. त्याने लक बाय चान्स या बॉलिवूडच्या चित्रपटात काम केले असून या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच छोटी होती. उर्मिला आणि मोहसिन यांची भेट मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात झाली होती. काही महिन्यांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न ३ मार्च २०१६ ला झाले. त्या दोघांच्या वयामध्ये नऊ वर्षांचे अंतर असल्याने त्यांच्या लग्नाच्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. 

उर्मिलाने निवडणूक लढवण्याच्या ठरवल्यापासून तिच्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण तिने यावर मौन राखणेच पसंत केले आहे. 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019काँग्रेसलोकसभा निवडणूक २०१९