अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ती पती मोहसीन अख्तरपासून ती वेगळी झाली आहे. घटस्फोटानंतर उर्मिला पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. यावेळी तिच्या बोटातील अंगठी गायब असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. उर्मिलाच्या हजेरीने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं.
उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर बॉलिवूडमधील चर्चेतलं कपल होतं. उर्मिला राजकारणात आल्यानंतर तर त्यांची खूप चर्चा झाली होती. मात्र आता त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तसंच या चर्चांनंतर उर्मिला पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसली. एका इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती. तिच्या बोटातील अंगठीही गायब होती. जांभळा रंगाचा लेहेंगा आणि प्रिंटेड कोटमध्ये ती पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर कमालीची ग्लो दिसत होता. उर्मिला याही वयात खूप सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये तिने रेड कार्पेटवर येत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मोहसीन अख्तर उर्मिलाहून १० वर्षांनी लहान आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, "उर्मिला किती कॉन्फिडंट दिसत आहे', 'उर्मिलाचा ग्लो तर पाहा' अशा कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. 2016 मध्ये उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन लग्नबंधनात अडकले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करणंही बंद केलं होतं.