Join us

मोदींवरचे बायोपिक म्हणजे चित्रपट नसून थट्टा- उर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 11:40 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’  चित्रपटावर आता काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उपरोधिक टीका केली आहे. ‘

ठळक मुद्देप्रदर्शनाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होऊ शकला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’  चित्रपटावर आता काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उपरोधिक टीका केली आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक म्हणजे, चित्रपट नसून थट्टा आहे. ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणा-यांनी काहीही केलेले नाही. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट येत असेल तर हा चित्रपट दुसरे काही नसून लोकशाही, गरीबी आणि भारताचे वैविध्य यांची थट्टा आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कधीच पूर्ण न झालेल्या आश्वासनांवर हवे तर एखादा विनोदी शो बनवला असता तर त्यालाही प्रचंड टीआरपी मिळाला असता, अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी टीका केली.  

 ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’चे प्रदर्शन थांबवण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती आणि यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. ‘पीएम नरेंद्र मोदी’ येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल काय?  याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले होते. त्यानुसार,  प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होऊ शकला नाही. काल निवडणूक आयोगाने हा चित्रपट पाहिला. यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :उर्मिला मातोंडकरपी. एम. नरेंद्र मोदीलोकसभा निवडणूक २०१९