उर्वशी रौतेला आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल उर्वशीच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. उर्वशीचा पावसात डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
लवकरच उर्वशी रौतेला वेबसिरीज "इन्स्पेक्टर अविनाश" मध्ये दिसणार आहे. यात ती पूनम मिश्रा म्हणजेच अविनाश मिश्राच्या बायकोची भूमिका साकारते आहे. ही भूमिका साकारण्यासाठी उर्वशी याचा पात्राचा चांगलाच अभ्यास करते आहे. "इन्स्पेक्टर अविनाश"मध्ये पूनमची भूमिका साकारण्यासाठा ती सध्या लखनवी भाषा शिकते आहे. यासाठी ती वेबसिरीजचे दिग्दर्शक नीरज यांची मदत घेते आहे. यात अविनाशची मिश्राची भूमिका रणदीप हुड्डा साकारणार आहे. थ्रिलर मालिका पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे.
२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला.