मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत खाष्ट सासू म्हणून अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. चार दशकांहून जास्त काळ त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच उषा नाडकर्णी छोट्या पडद्यावरील बस बाई बस (Bas Bai Bas) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बरेच भन्नाट किस्से शेअर केले.
‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात उषा नाडकर्णी यांना त्यांच्या सिनेइंंडस्ट्रीतील कारकिर्दीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी मला चांगल्या भूमिका साकारता आल्या नाही, अशी खंत व्यक्त केली. तुमच्या अभिनयाला वाव देणारी भूमिका आजवर कधी मिळाली नाही, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न सुबोधने उषा नाडकर्णींना विचारला. त्यावर त्यांनी हो असे उत्तर दिले. त्यावर सुबोधने हे उत्तर मला अपेक्षित होते, असे सांगितले. त्यावर पुढे सुबोधने असे का वाटते असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, कितीतरी चांगल्या चांगल्या भूमिका होत्या. आई रिटायर होते यामधली भूमिका, संतू रंगीली या गुजराती नाटकात मनसूख म्हणून होते. त्यांचा मुलगा राजीव जोशी याने आमचे पवित्र रिश्ता लिहिले. त्यावेळी त्यांनी मला संतू रंगीली या नाटक पाहायला ये असे सांगितले आणि ते मला घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी आपण मराठीत हे नाटक करणार आहोत, तेव्हा ते तू करशील असे विचारले होते. असे एक नाही खूप भूमिका आहेत. त्या भूमिकेतील लोकांनी जे केले त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने ते वेगळ्या पद्धतीने केले असते.