सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताहेत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होत असून ती भाषा मराठी असल्याने रसिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. येणाऱ्या आठवड्यात शास्त्रीय आणि सुगम संगीताची मैफील रसिकांना ऐकायला मिळणार आहे. ‘चिकमोत्यांची माळ’, ‘खोप्यामध्ये खोपा’, ‘बंधू येईल न्यायला', 'गौरी गणपतीच्या सणाला’, यांसारखी गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या गायिका उत्तरा केळकर आणि शास्त्रीय संगीतातल्या सूरसम्राज्ञी आरती अंकलीकर-टिकेकर 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार आहेत.
Indian Idol Marathi च्या मंचावर पहिल्यांदाच येणार उत्तरा केळकर आणि आरती अंकलेकर टिकेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 3:12 PM