मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईकनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. आता तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या बॉयफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत त्या दोघांचा रोमँटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मानसी नाईकने इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे जान प्रदीप खरेरा. आय लव्ह यू. तुझी लढाई ती माझी लढाई. आपण दोघे सामोरे जाऊ.
मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.