Join us

"शिरीषबद्दल सांगितलं तेव्हा बाबांनी..." वंदना गुप्तेंनी सांगितला बघण्याच्या कार्यक्रमाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 4:55 PM

त्या दिवशी बाबा त्याला स्टडीरुममध्ये घेऊन गेले.

अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)  आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जातात. त्यांचं बोलणं, हसणं सगळंच एकदम बिंधास्त असतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मराठी सिनसृष्टीत काम करत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकतंच त्यांनी अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आयुष्यातील अनेक असे किस्से सांगितले ज्यावर प्रेक्षक अगदी पोट धरुन हसले.

यंदाचा अवधूतचा कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते' नव्हे तर गुप्ते तिथे गुप्ते असा झाला. वंदना गुप्ते यांनी त्यांच्या स्टाईलने दिलखुलास संवाद साधत कार्यक्रमात धमाल आणली. त्यांच्या आयुष्यात शिरीष गुप्ते यांची एंट्री कशी झाली आणि शिरीष यांच्याबद्दल जेव्हा त्यांनी पहिल्यांदा घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. त्या म्हणाल्या,'शिरीषला मी लग्नाआधीपासून ओळखत होते. मी सर्वात आधी माझ्या बहिणींना सांगितलं की शिरीषने मला मागणी घातली आहे. तेव्हा दोघी बहिणी खुश झाल्या आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. मग मी आई वडिलांना सांगितलं. तर वडील म्हणाले त्याला घरी घेऊन ये. मग एकेदिवशी शिरीष घरी आला. त्या दिवशी बाबा त्याला स्टडीरुममध्ये घेऊन गेले. तिथे दरवाजाच्या मागे एक झाडू ठेवला होता. तेव्हा शिरीष चांगलाच घाबरला की आता त्याचं नेमकं काय होणार. पण वडिलांना मस्त त्याची मुलाखत घेतली आणि नात्याला होकार दिला.'

वंदना गुप्ते आणि शिरीष यांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाचे त्यांचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. हा खास दिवस त्यांनी लग्नाचे विधी पुन्हा पार पाडत साजरा केला होता. 

टॅग्स :वंदना गुप्तेमराठी अभिनेताटेलिव्हिजन