मेक्सिकोची व्हेनेसा पोन्स डी लिऑन ही ‘मिस वर्ल्ड २०१८’ ठरली. चीनच्या सान्या शहरात ६८ वी ‘मिस वर्ल्ड २०१८’ स्पर्धा आयोजित केली गेली. गतवर्षी ‘मिस वर्ल्ड’चा ताज आपल्या नावावर करणाऱ्या भारताच्या मानुषी छिल्लरने व्हेनेसाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. स्पर्धेतील ११८ स्पर्धकांना मागे टाकत लिऑनने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची अनुकृती वास ही टॉप ३० पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. पण टॉप १२ मध्ये तिला आपले स्थान राखता आले नाही.
यंदाची ‘मिस वर्ल्ड २०१८’चा किताब जिंकणारी व्हेनेसा कोण, कुठली, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. तिचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तर व्हेनेसा पोन्स डी लिआॅन हिचा जन्म ७ मार्च १९९२ रोजी झाला होता.
ती फुल टाइम मॉडल असून, हा ताज आपल्या डोक्यावर चढवणारी ती पहिली मॅक्सिकन आहे.