गणेशोत्सवाची धूम ही खरी गावाकडे असते. जसा जसा गणेशोत्सव जवळ येतो तसं लगेच चाकरमानी सुट्ट्या टाकून गावाची वाट धरतात. कोकणात तर गणेशोत्सवाची वेगळीच धूम असते. पारंपारिक पद्धतीने इथे आजही हा उत्सव साजरा होतो. मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनीही आपल्या गोव्यातील घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. तसंच अभिनेत्री गिरीज प्रभूचं त्यांनी आपल्या घरी स्वागत केलं त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.
वर्षा उसगांवकर या मराठीतील दिग्गज अभिनेत्री. त्यांनी आपल्या अभिनयाने ९० चा काळ गाजवला. गोव्यातील उसगाव हे त्यांचं मूळ गाव आहे. तिथे आजही त्यांचं घर आहे. आपल्या घराची झलक त्यांनी व्हिडिओ शेअर करत दाखवली आहे. घरासमोर तुळशी वृंदावन, लांब खोल्या, गणपती बाप्पाची मूर्ती असं प्रसन्न वातावरण दिसत आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभूला त्यांनी आपल्या या घरी आमंत्रण दिलं होतं. वर्षा उसगांवकर यांनी गिरीजाचा हात धरुन तिला घराची सैर केली. तसंच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दोघींचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडलाय.
वर्षा उसगांवकर आणि गिरीजा प्रभू दोघीही 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत काम करत आहेत. काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली आहे. मालिकेत वर्षा या गिरीजाच्या सासूच्या भूमिकेत आहेत. ऑफ कॅमेराही त्यांच्यात किती चांगला बाँड आहे हे या व्हिडिओतून त्यांनी दाखवून दिलं.