अभिनेता वरुण धवन कलाकारांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे प्रोजेक्टस आणि इतर गोष्टीदेखील चाहत्यांसह शेअर करत असतो. वरुण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. २४ जानेवारी २०२१ मध्ये अलिबाग येथे डेस्टिनेशन वेडिंग केले होते. सोशल मीडियावरच तो प्रेमात असल्याचे त्याने सांगितले होते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करताना दिसला. आता पुन्हा एक व्हिडीओ शेअर करत त्याने त्याचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे.
नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि पितृत्व स्विकारल्याची भावना त्याने शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांनाच नाव सुचवण्यासाठी सांगिले आहे. त्याच्या घरी त्याने कुत्र्याचं पिल्लु आणले आहे. त्याच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला त्याने कॅप्शनही फादरहुड देत माझ्या मुलाचं नाव काय ठेवावं मला सुचत नाही कृपया माझी मदत करा असे त्याने म्हटले आहे.
व्हिडीओ पाहून अनेक चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर सेलिब्रेटींनी देखील त्याच्या या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, उर्वशी रौतेला, गुरु रंधावा, नुसरत भरुचा यासारखे सेलिब्रेटींना त्याच्या या व्हिडीओला लाईक्स कमेंट्स करत शुभेच्छा देताना दिसतायेत.
वरूण धवनने २०१७ मध्ये आपलं नवं घर खरेदी केलं होतं. याच घरात लिव्हइनमध्ये नताशासोबत वरुणला राहायचे होते. लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी कुटुंबाने नकार दिला त्यामुळे लग्न झाल्यानंतर याच घरात नताशासोबत वरुण धवन शिफ्ट झाला. त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरात या कपलने त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे वरुणच्या घराचे इंटेरिअर नताशानेच केले आहे. त्यामुळे सुरुवातीपासून नताशाच्या आवडीनुसारच घर सजवण्यात आले आहे.