Join us

लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 08:46 IST

वरुण धवन आणि नताशा दलाल यांना कन्यारत्नाची प्राप्ती, लग्नानंतर ३ वर्षांनी झाले आईबाबा

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी गुडन्यूज दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवननेदेखील बाबा होणार असल्याची गुडन्यूज काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना दिली होती. पत्नी नताशा दलालचा बेबी बंपचा फोटो शेअर करत वरुणने आईबाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. वरुणची पत्नी नताशाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोमवारी(३ जून) रात्री वरुण आणि नताशाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. 

वरुणचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी मुलगी झाल्याची बातमी माध्यमांना दिली. हिंदुजा रुग्णालयात नताशाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. आजोबा झाल्यानंतर डेव्हिड धवन यांचा गगनात मावेनासा झाला होता. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नातीला पाहायला गेलेल्या डेव्हिड धवन यांनी आजोबा झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. याचा व्हिडिओ वरिंदर चावला या पापाराजी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ते "मुलगी झाली" असं म्हणताना दिसत आहेत. 

नताशा आणि वरुण धवन यांनी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. २४ जानेवारी २०२१ रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी वरुण धवन आणि नताशाने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. नताशा-वरुण आईबाबा झाल्याचं कळताच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :वरूण धवननताशा दलालसेलिब्रिटी