कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. नुकताच वरुणने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा हॉट फोटो त्याच्या फॅन्सना भावला आहे. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे.
कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात. अभिनेता वरुण धवन त्याच कलाकारांपैकी एक. प्रत्येक सिनेमासाठी वरुण बरीच मेहनत घेतो.
पिळदार बॉडी कमावण्यासाठी वरुणने बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले. वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. तो छाती आणि कमरेवर जास्त लक्ष देतो. वजन वाढवण्यासह वरुणच्या एब्सवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे. अंडी, ओट्स, सँडविच, ब्राऊन राइस असा त्याचा आहार देण्यात आला आहे.आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.
आलिया नेहमी चित्रपटाशिवाय दिलखेचक अंदाजासाठी चर्चेत येत असते. एका मुलाखतीमधला आलियाचा एक किस्सा सध्या ऐकायला मिळतो आहे.सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, अर्जुन कपूर या तिघांमध्ये कोण चांगला किसर आहे. आलियाने करण जोहरच्या या प्रश्नावर म्हटले की, मी किस केल्यानंतर त्याची तुलना करत नाही. आलिया भटने स्टुडंट ऑफ द ईअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात आलिया भटसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर वरूण आणि आलिया आणखी काही चित्रपटात एकत्र दिसले आहेत.