सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सीबीआय चौकशीची मागणी केली. आता वरुण धवन याने सुशांत केसमध्ये सीबीआयची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून सुशांत केसमध्ये सीबीआय चौकशीला आपलं समर्थन दर्शवलं आहे. पण त्याची ही पोस्ट लोकांना आवडली नाही. लोकांनी त्याचं कौतुक करण्याऐवजी त्याला ट्रोल केलंय. तसेच म्हणाले की, आगामी सिनेमासाठी सहानुभूति मिळवायची आहे.
यूजर्स म्हणाले की, आलिया भट्टच्या आगामी सडक २ सिनेमाच्या ट्रेलरला रेकॉर्ड ब्रेक डिस्लाइक मिळाल्यावर वरुण घाबरला आहे. आता तो त्याच्या आगामी 'कूली नंबर १' ला वाचवण्याच्या पावित्र्यात आहे आणि म्हणून तो सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा दिखावा करत आहे.
तर एका दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'भाऊ, फारच लवकर आलाय. सडक २ चे हाल पाहून घाबरलाय. ही तर सुरूवात आहे'.
एका यूजरने लिहिले की, 'किर्ति सेननचं समजू शकतो. तिच्यावर प्रेशर राहिलं असेल. तरी तिने इनडायरेक्टली पोस्ट केल्या होत्या. वरुण धवन, सूरज पांचोली दोघेही ड्रामा करत आहेत. या दोघांवर असं काय प्रेशर होतं की, आधी बोलले नाहीत आणि आता बोलत आहेत'.
अशा वेगवेगळ्या कमेंट करून लोक वरुण धवनला ट्रोल करत आहेत. वरुण धवनकडून सुशांतच्या केसची सीबीआय मागणी करणं लोकांना नौटंकी वाटत आहे. लोकांचं मत आहे की, वरुणचा आगामी येणारा सिनेमा म्हणजे कुली नंबर १ आहे. यात तो सारा अली खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा वाचवण्यासाठी तो हे नाटक करत असल्याचं मानलं जात आहे.
हे पण वाचा :
माझ्या मुलीसारखेच सुशांतलासुद्धा मारुन टाकलं, जिया खानच्या आईचा धक्कादायक आरोप
सुशांतचा ड्राईव्हर म्हणाला, सर आत्महत्या करूच शकत नाहीत; सांगितला ‘तो’ किस्सा
#CBIforSSR सत्य समजायलाच हवं, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही मागितला न्याय