Join us

‘सुई धागा’साठी वरूण धवन शिकला ‘हे’ काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 08:00 IST

सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. मौजी आणि ममता यांचा संघर्ष आणि जीवनकहानी यात रंगवली आहे.

ठळक मुद्देसुई धागामुळे अनेक आकर्षक कला शिकू शकलो - वरूण धवनसुई-धागा चित्रपट 28 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. मौजी आणि ममता यांचा संघर्ष आणि जीवनकहानी यात रंगवली आहे. या चित्रपटासाठी दोन्ही कलाकारांनी खूप मेहनत घेतली असून हातमागच्या विविध कला आणि प्रकार त्यांनी शिकले आहेत. या कला शिकण्यासाठी त्यांनी वर्कशॉप्समध्ये देखील दिवसाचे अनेक तास मेहनत केली आहे. वरूणने हातमागाच्या या कला शिकण्यासाठी विविध कामगारांना भेटला. त्यांच्याकडून वरूणने हातमाग या कलेचे विविध प्रकार शिकून घेतले. 

याबाबत वरूणने सांगितले की, ‘सुई धागा मुळे अनेक वेगवेगळया आणि आकर्षक कला शिकू शकलो. मौजी हा खूप उत्साही आणि त्याच्या स्वप्नांबद्दल खूप जास्त प्रमाणात महत्त्वाकांक्षी असतो. त्याची पत्नी ममताच्या सोबतीने तो त्याचे स्वप्न पूर्ण करतो. हातमाग आणि वीणकाम यांचे वेगवेगळे प्रकार मौजी शिकतो. अतिशय कठीण अशा या कला मला मौजीमुळे शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी खरंच स्वत:ला खूप नशीबवान समजतो. चंदेरी येथे मूळ रहिवासी कामगार यांच्याकडून मी या कला शिकल्या आहेत. मी जवळपास एक आठवडा त्यांच्याकडे जाऊन या कलांचे महत्त्व समजून घेतले. त्यांचे राहणीमान, जीवनशैली हे सर्व देखील मला शिकायचे होते. मला आत्तापर्यंत खूप चांगले शिक्षक या प्रवासात मिळाले.’'सुई धागा' या चित्रपटात एका दाम्पत्याची कथा सांगण्यात आली आहे. जे अनेक खस्ता खात स्वत:चा व्यवसाय सुरु करतात. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा ममता(अनुष्का) आणि मौजी(वरुण धवन) यांची आहे. मौजी हा लहान-मोठी नौकरी करत असतो, त्याला मालकाकडून अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागतो. तर ममता गृहिणी आहे. नवऱ्याच्या सततच्या अपमानामुळे व्यतित ममता त्याला नोकरी सोडून स्वत:चे काम करण्याचा सल्ला देते. मौजी नोकरी सोडतो आणि शिलाईचा व्यवसाय उघडतो. यामध्ये ममता त्याला खूप प्रोत्साहन व सहकार्य करताना दाखवली आहे. सुई-धागा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सुई-धागावरूण धवन