Join us

थिएटर्समध्ये Veere Di Wedding फॅन्सची धमाल, VIDEO व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:09 IST

करिना कपूर- खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘वीरे दि वेडिंग’सिनेमाचे फॅन्स थिएटरमध्ये सिनेमा संपताच तारीफां गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई :  अभिनेत्री करिना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या चार मैत्रिणींची कथा असलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दुस-या आठवड्यापर्यंत देशभरात 71.71 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. अभिनेत्री करिना कपूर-खानने सोशल मीडियावर सिनेमाच्या फॅन्सचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. 

करिना कपूर- खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘वीरे दि वेडिंग’सिनेमाचे फॅन्स थिएटरमध्ये सिनेमा संपताच तारीफां गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरासरी थिएटरमध्ये आतापर्यंत पुरुष डान्स करताना पाहायला मिळाले. मात्र, ‘वीरे दि वेडिंग’ने आम्हाला दाखविले की, मुली सुद्धा डान्स करुन धमाल करु शकतात, असे करिनाने म्हटले आहे.

 

‘वीरे दि वेडिंग’ सिनेमाला फक्त देशातच नाही तर विदेशात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शशांक घोष दिग्दर्शित, एकता कपूरची सहनिर्मिती असलेला ‘वीरे दि वेडिंग’ हा सिनेमा 1 जून 2018 रोजी प्रदर्शित झाला आहे. लग्नाच्या निमित्ताने पुन्हा भेटलेल्या चार मैत्रिणींची गोष्ट या सिनेमात आहे.  

 

टॅग्स :वीरे दि वेडिंग सिनेमाबॉलिवूडकरिना कपूरसोनम कपूरसोशल मीडियासोशल व्हायरल