Join us

लवकरच मकरंद देशपांडे लावणार कानाला खडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 08:00 IST

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी अभिनेता मकरंद देशपांडे कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे. मकरंद देशपांडे या भागात त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहेत.

ठळक मुद्देनवनवीन व भन्नाट किस्स्यांची मैफिल या कार्यक्रमातून प्रेक्षकांसाठी सादर करण्यात येत आहे

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसंच कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांची मैफिल या कार्यक्रमातून प्रेक्षकांसाठी सादर करण्यात येत आहे.

येत्या भागात संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी अभिनेता मकरंद देशपांडे कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे. मकरंद देशपांडे या भागात त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहेत. कानाला खडा म्हणजे केलेली चूक परत न करणे, पण जर आयुष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टींची खंत नसेल तर तुम्ही आयुष्यात काही शिकला नाहीत. माणूस हा नेहमी चुकांमधून शिकतो त्यामुळे माणसाने कानाला खडा लावला आणि नव्या चुका करत शिकावं, असं मकरंद म्हणाले. मकरंद यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला, त्याचसोबत मकरंद यांच्या काही जवळच्या मित्रांनी देखील काही गोष्टींचा खुलासा केला. 

टॅग्स :कानाला खडा