काही दिवसांपूर्वी अभिनेता किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच चिंता वाढली होती. किरण कुमार यांनीच एक चांगली बातमी दिली आहे. त्यांची तिसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर त्यांनी मात करत आता ते ठणणीत बरे झाले आहेत. मुळात त्यांना कोरोनाची कोणतची लक्षणं दिसली नव्हती तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सा-यांना धक्का बसला होता. त्यांनी रूग्णालयात न जाता घरातच स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. वेळोवेळी ते डॉक्टरांच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी घरगुती उपचार देखील केले. यात हळदीचा वापर त्यांनी अधिक फायदेशीर ठरल्याचे सांगितले. तसेच कोरोनाला घाबरून न जाता सकारात्मक राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी स्वतःला विविध गोष्टी करण्यात बिझी ठेवले. त्या दरम्यान योगा करणे, ध्यान करणे, मनोरंजनासाठी वेब सिरीज पाहणे, पुस्तके वाचणे अशा गोष्टी केल्या. कुटुंबातील सदस्य, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांनेही त्यांचे मनोबल वाढवले. किरण कुमार सध्या 74 वर्षांचे असून त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सध्या आपली प्रकृती ठिक असल्याचंही किरण कुमार यांनी सांगितलं.
किरण कुमार यांच्या आधी बॉलीवूडमध्ये अनेकाना कोरोनानाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. आता सगळे कोरोनामुक्त आहेत.