Join us

'द ग्रेट इंडियन फॅमिली'त झळकणार विकी कौशल आणि मानुषी छिल्लर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:18 IST

विकी कौशल आणि मानुषी छिल्लर आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि मानुषी छिल्लर आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहेत. आता या चित्रपटाचे नाव निश्‍चित करण्यात आले असून 'द ग्रेट इंडियन फॅमिली' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि मानुषी या नवीन जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 

'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाची निर्मिती 'यशराज फिल्म्स'च्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटातून विकी आणि मानुषीची जोडी झळकणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे बरेचसे शूटिंग विकी आणि मानुषी यांनी पूर्ण केले आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचे शीर्षक निश्‍चित करण्यात आले आहे. यशराज निर्मित 'पृथ्वीराज' हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज करण्यात येणार आहे. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे.विकी कौशल पहिल्यांदाच विनोदी चित्रपटात काम करतो आहे. 

विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर उरीचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी पुन्हा एकदा काम करणार आहे. 'अश्वत्थामा'वर सिनेमा तयार करत आहेत. यात विकी गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामाचीच भूमिका साकारणार आहे. . तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे. याशिवाय तो सारे जहां से अच्छा, सैम, सरदार उधम सिंग आणि तख्तमध्ये दिसणार आहे. विकी कौशल शेवटचा भूत चित्रपटात दिसला होता.

टॅग्स :विकी कौशलमानुषी छिल्लर