Join us  

Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:10 AM

विकी कौशल हा सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. विकीचा नुकताच एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. नेमकं काय घडलं बघा (vicky kaushal)

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीने आजवर विविध सिनेमांमधून हिंदी इंडस्ट्रीत स्वतःचं खास स्थान मिळवलं आहे. विकीने 'मसान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे विकीने रोमँटिक, कॉमेडी, बायोपीक अशा विविध धाटणीच्या सिनेमांमध्ये काम केलं. विकी नुकताच चर्चेत आलाय कारण त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. विकीने गडबडीत एअरपोर्टवर रांग मोडली. मग पुढे काय घडलं बघा...

झालं असं की.. विकी नेहमीप्रमाणे कॅज्युअल लूकमध्ये एअरपोर्टवर आला. त्याने पापाराझींना बघून फोटोसाठी पोज दिली. पुढे तो एअरपोर्टच्या आत जाण्यासाठी निघाला. तिथे आधीच एक माणूस चेकपॉईंटवर उभा होता. विकी नकळत त्या माणसाच्या पुढे जाऊन उभा राहतो. विकीला नंतर त्याची चूक लक्षात येते. तो त्या सहप्रवाशाच्या मागे जायला लागतो तोच तो सहप्रवासी त्याला अडवतो आणि 'काही हरकत नाही', असे हावभाव करताना दिसतो.

पुढे विकी त्या माणसाचे आभार मानतो. दोघांमध्ये छोटासा संवाद सुद्धा झाल्याचा पाहायला मिळतो. पुढे विकी हसत निघून जातो. हा छोटासा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय. विकीने त्या सहप्रवाश्याला दिलेल्या नम्र वागणुकीने सर्वांचं मन जिंकलंय. विकी सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत 'छावा' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपुर्वी विकीचे सेटवरील फोटो लीक झाले होते.

टॅग्स :विकी कौशलमराठीमराठी अभिनेतासंभाजी राजे छत्रपती