Join us  

विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 10:22 AM

Vicky Kaushal And Katrina Kaif Christmas : विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा केला. यानिमित्ताने विकीने आपल्या नववधूसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी याच महिन्यात 9 तारखेला लग्नबंधनात अडकले. लग्न झाल्यापासून नवं जोडपं सतत चर्चेत आहेत. लग्नानंतर विकी व कतरिना आपआपल्या कामावर पतरले आहेत. पण एकमेकांना क्वालिटी टाईम देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. काल दोघांनीही लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा केला. यानिमित्ताने विकीने आपल्या नववधूसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

विकीने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. केवळ 13 तासांत 32 लाखांवर लोकांनी या फोटोला लाइक केलं आहे. कमेंट्सचाही पूर आला आहे. सुंदर जोडप, बेस्ट कपल इन द वर्ल्ड, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. (Vicky Kaushal And Katrina Kaif Christmas) 

 

फोटोत विकीने कॅटला हृदयाशी कवटळलं आहे. दोघांच्याही चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘मेरी ख्रिसमस’ असं कॅप्शन देत आणि सोबत ख्रिसमस ट्री व हार्ट इमोजी पोस्ट करत, त्याने हे फोटो शेअर केले आहेत. कतरिनानेही तिच्या इन्स्टास्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत.

लग्नानंतर कतरिना श्रीराम राघवन यांच्या चित्रपटात दिसणार आहे. ‘मेरी ख्रिसमस’ असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाचं शूटींगही तिनं सुरू केले आहे. विकी सुद्धा त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटींगसाठी मुंबईला रवाना झाला होता. अर्थात ख्रिसमससाठी तो खास मुंबईत परतला.विकी लवकरच गोविंदा मेरा नाम, द ग्रेट इंडियन फॅमिली, तख्त, सॅम बहादूर, द इम्मोर्टल अश्वत्थामा या चित्रपटात दिसणार आहे. तर कतरिना जानेवारीत सलमानसोबतच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाचं उर्वरित शूटींग पूर्ण करणार आहे.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ