Join us  

लीक झाला विकी कौशलचा डान्स व्हिडीओ, डान्स पाहून कतरिना करत होती ब्लश; लोक म्हणाले-बेस्ट जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:19 PM

विकी कौशलने पत्नी कतरिनासाठी केलेल्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विकीचा डान्स पाहून कतरिनाही ब्लश करताना दिसत आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत आणि चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. विकी आणि कतरिना अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येतात. विकी कौशलने पत्नी कतरिनासाठी केलेल्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विकीचा डान्स पाहून कतरिनाही ब्लश करताना दिसत आहे.

विकी आणि कतरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विकी किंवा कतरिनाने पोस्ट केलेला नाही, दिग्दर्शिक कबीर खानची पत्नी मिनी माथूरने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मिनीने तिचे 2022 चे संस्मरणीय क्षण दाखवलं आहेत, ज्यामध्ये विकी आणि कतरिना देखील आहेत. मिनी विकी आणि कतरिनाची जवळची मैत्रीण.

व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना काही सेकंदासाठी दिसत आहेत. विकी एक मजेदार डान्स परफॉर्मन्स देत आहे, ज्याला पाहून कतरिना लाजत आहे. अभिनेत्री शर्वरी वाघही विकीसोबत व्हिडिओमध्ये डान्स करत आहे.  गेल्या काही दिवसांपासून सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे, जेव्हा हे सगळं कतरिना कैफचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले  होते. विकीच्या डान्सवर युजर्सही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'ते सर्वोत्कृष्ट कपल आहेत', तर दुसऱ्याने लिहिले, 'विक्कीचा डान्स पाहून लाल झालेल्या कतरिना खरोखरच क्यूट आहे.' चाहते दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ