Join us  

विकी कौशल पुन्हा दिसला कतरिना कैफच्या घराच्या बाहेर, पाहा हा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 5:07 PM

या व्हिडिओत विकी कौशल आपल्या कारमध्ये असून तो कतरिनाच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे.

ठळक मुद्देहर्षवर्धनमुळे सगळ्यांना विकी आणि कतरिनाबद्दल कळले असले तरी याबाबत मीडियाशी काहीच बोलायचे नाही असे बहुधा त्या दोघांनी ठरवले आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलिवूडचे दोन लव्ह बर्ड्स सध्या जाम चर्चेत आहेत. गेल्या वर्षी या दोघांच्या डेटींगची चर्चा सुरू झाली होती. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅट सिंगल होती. अशात विकी तिच्या आयुष्यात आला आणि बघता बघता दोघेही एकमेकांत गुंतले. म्हणायला विकी व कतरिना दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगले आहे. पण नुकतेच हर्षवर्धन कपूरने (Harshvardhan Kapoor) सांगायचे ते सांगितलेय. विकी व कतरिना सोबत आहेत आणि हे खरे आहे, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले आणि दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले.

हर्षवर्धनमुळे सगळ्यांना विकी आणि कतरिनाबद्दल कळले असले तरी याबाबत मीडियाशी काहीच बोलायचे नाही असे बहुधा त्या दोघांनी ठरवले आहे. नुकतेच विकीला कतरिनाच्या अपार्टमेंटमधून बाहेर येताना पाहाण्यात आले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या महिन्याभरातली ही दुसरी वेळ आहे जेव्हा कतरिनाच्या घराच्या बाहेर विकी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

या व्हिडिओत विकी कौशल आपल्या कारमध्ये असून तो कतरिनाच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर कतरिनाचा ड्रायव्हरही यासाठी त्याला मदत करताना दिसत आहे. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ