Join us  

Vicky Kaushal : विकी कौशलला 'त्या' चित्रपटात काम न केल्याची खंत; प्राण्यांसोबत ट्रक मधून मारायची होती उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 5:45 PM

विकीला एका गोष्टीची खंत आहे. त्या एका सिनेमाचा भाग होऊ शकलो नाही याची खंत त्याला कायम आहे.

Vicky Kaushal : बॉलिवुड अभिनेता विकी कौशल सध्या चांगलाच गाजतोय. कॅटरिना सोबत लग्न असो किंवा एका मागोमाग चित्रपट प्रत्येक ठिकाणी विकीचीच हवा आहे. मात्र विकीला एका गोष्टीची खंत आहे. त्या एका सिनेमाचा भाग होऊ शकलो नाही याची खंत त्याला कायम आहे. तो सिनेमा म्हणजे एस एस राजमौली (SS Rajamauli) यांचा 'आरआरआर' (RRR)

एका मुलाखतीत विकी कौशल म्हणाला, 'माझ्यासाठी आरआरआर अशी फिल्म आहे ज्याचा मी भाग नाही याची मला खंत आहे. राजामौली यांचे वैशिष्ट्यच आहे की ते अभिनेत्याच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावना जागी करतात. मला त्याचाच भाग व्हायचे होते. मला प्राण्यांसोबत त्या ट्रक मधून बाहेर उडी मारायची होती. ते जेव्हा जेव्हा कोणताही चित्रपट बनवताता मला असे वाटते मी त्या सिनेमाचा भाग असावं.'

विकी कौशल आगामी 'गोविंदा नाम मेरा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येतोय. करण जोहरने सिनेमाची निर्मिती केली आहे. यामध्ये किआरा अडवाणी आणि भूमि पेडणेकर यांचीही भूमिका आहे.

टॅग्स :विकी कौशलएस.एस. राजमौलीआरआरआर सिनेमाबॉलिवूड