ट्रेडिंग कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. डिसेंबरमध्ये दोघेही लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत. लग्नाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. या दोघांचे लग्न राजस्थानातील जयपूरमध्ये थाटात पार पडणार आहे. डिसेंबर महिन्यात 7 ते 9 तारखेदरम्यान या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. या लग्न सोहळ्याची जयपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना देखील लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रेटी मात्र या दोघांच्या लग्नात उपस्थित राहू शकणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच या लग्नात कोण कोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार अशा सेलिब्रेटींची यादी समोर आली होती. यात मात्र कतरिनाच्या सगळ्यात जवळचे मित्रच या लग्नाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कतरिनाचा ऐन लग्नाच्याच दिवशीच हिरमोड होणार हे मात्र नक्की.
यात सगळ्यात पहिले नाव आहे ते म्हणजे बॉलिवूडचा दबंग सलमान खान. कधीकाळी सलमान कतरिनाच्या खूप जवळचा व्यक्ती समजला जात होता. मात्र आता त्यांच्या या दुरावलेल्या नात्यामुळे तो या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे.
दुसरे नाव आहे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे. नुकताच प्रदर्शित झालेला 'सुर्यवंशी' सिनेमात अक्षय कुमार आणि कतरिना दोघांनी एकत्र काम केले आहे. यापूर्वीही दोघे अनेक सिनेमात झळकले आहेत. मात्र तरीही अक्षय या लग्नाला गैरहजर असणार आहे. लग्नाच्या दरम्यान अक्षय त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे त्याला या लग्नासाठी वेळ काढणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
अजय देवगण तसेही फारसा कोणत्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात तो दिसत नाही. प्रमोशन कार्यक्रमाव्यतिरिक्त तो फारसा कुठे जाण्यास उत्सुक नसतो. शाहरूख खानचेही कतरिनासोबत खूप चांगले बॉन्डींग आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आर्यन खानमुळे खूप बिझी आहे. त्याच कारणामुळे तो या लग्नात उपस्थित राहु शकणार नाही.आमिर खानसुद्धा त्याचा आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'च्या कामात तो बिझी आहे. त्यामुळे आमिरसुद्धा या लग्नात दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याने दोघेही लग्नाच्या तयारी बिझी आहेत. त्यामुळे हे ट्रेडिंग कपलसुद्धा या लग्नात नसणार असल्याच्या चर्चा आहेत.तसेच आलियाआधी रणबीर कतरिनाला डेट करत होता हे यामागचे कारण असू शकते.