Join us  

it's a wrap : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं शुटिंग पुर्ण; सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला - 'शूटिंग संपलं आणि पाऊस...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 11:23 AM

अभिनेता विकी कौशल सध्या चांगलाच चर्चेत आहे. विकी कौशलने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. विकी सध्या चर्चेत असण्याचं ...

अभिनेता विकी कौशल सध्या चांगलाच चर्चेत आहे. विकी कौशलने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. विकी सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे मोठ्या ऐतिहासिक 'छावा' सिनेमात तो संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. विकीच्या या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. आता या सिनेमासंदर्भात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विकी कौशल याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत 'छावा' सिनेमाचं शुटिंग पुर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.

 विकीच्या 'छावा' सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. विकीनं सेटवरील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतोय. त्याने पोस्टमध्ये लिहलं, त्यांनी लिहिले, "छावा सिनेमाच्या शुटिंगचा असा अविश्वसनीय उत्कट आणि नाट्यमय प्रवास हा थोड्याश्या ड्रामाशिवाय संपू शकला नसता. आम्ही आमचा शेवटचा शॉट घेतल्यानंतर लगेचच पावसाने हजेरी लावली आणि आमच्यासाठी एक शो ठेवला. खरं तर या प्रवासाबद्दल मला खूप काही सांगायचं आहे. पण, आता शब्दात फार कमी सांगू शकतोय. आता ऐवढचं सांगू शकेन की, माझं हृदय हे कृतज्ञता, प्रेम आणि समाधानाने भरलं आहे...it's wrap!!!'.

विकी कौशल याने 'छावा' सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी त्यानं  दाढी देखील वाढली आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक दीड वर्षापासून विकीनं कोणत्याही दुसऱ्या प्रोजेक्टवर काम केलं नाहीये. काही दिवसांपुर्वी विकीचा 'छावा' सिनेमातील लूक व्हायरल झाला होता. ज्यामध्ये  विकी संभाजी महाराजांच्या भूमिकेत चांगलाच शोभून दिसला. त्याची पिळदार शरीरयष्टी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आणखी प्रभावी वाटली.

'छावा' या सिनेमात विकीसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई सरकार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय 'छावा'मध्ये मराठमोळा संतोष जुवेकर सुद्धा खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. लक्ष्मण उतेकरचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे.  लक्ष्मण यांच्याकडे विषय उत्तमपणे सादर करण्याची हातोटी आहे. लक्ष्मण यांचं दिग्दर्शन असलेला 'मिमी' सिनेमा चांगलाच गाजला होता. विकीच्या 'छावा' सिनेमाला लोकांचं प्रेम मिळणार यात शंका नाही.  

टॅग्स :विकी कौशलसेलिब्रिटीसिनेमासंभाजी राजे छत्रपती