अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या चर्चेत आहे तो ‘सरदार उधम’ (Sardar Udham ) या चित्रपटामुळे. होय, गेल्या 16 ऑक्टोबरला ओटीटीवर हा सिनेमा रिलीज झाला आणि चित्रपटातील विकीचा अभिनय पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. या चित्रपटासाठी विकीने प्रचंड मेहनत घेतलीये. त्याचा शूटींगदरम्यानचा हा फोटो पाहून तुम्हालाही याची कल्पना येईल.विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विकीच्या पाठीवर अनेक वार आणि त्याच्या जखमा दिसत आहेत. या फोटोला त्याने ‘कट्स डिडंट कट’ असं कॅप्शन दिलंय. जणू कोणी विकीच्या पाठीवर असंख्य चाबकाचे फटके मारलेत, असे हे वार आहेत. पाठीवरच्या काही जखमा तर अगदी ताज्या दिसत आहेत. निश्चितपणे या जखमा, मारल्याचे वार खोटे आहेत, मेकअप आणि क्रिएटर्सची कमाल आहे. पण तरिही पहिल्या नजरेत कमकुवत हृदय असणारे ते पाहून विचलित होऊ शकतात.
विकीच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेक चाहत्यांना तर हा फोटो पाहून एकदम कतरिना कैफ (Katrina Kaif ) आठवली. कतरिनाला हे पाहून दु:ख होईल, अशी कमेंट एका युजरने केली. अनेक युजर्सला विकीच्या पाठीवरचे हे वार खरे की खोटे, हे कळेना. सर, रिअल वाटत आहेत. खरंच असं झालं का? असा सवाल एका चाहत्याने केला.आम्ही सांगू इच्छितो की, विकीच्या पाठीवरचे हे वार प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट Peter Gorsheninने तयार केले आहेत.या चित्रपटाशिवाय विकी त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. विकी आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. अनेकांना विकीचे फोटो पाहून कॅटची काळजी वाटली ते त्यामुळेच.