69th Filmfare Awards 2024: सध्या कलाविश्वाामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे bigg boss 17 चा ग्रँड फिनाले सोहळा रंगत आहे. तर, दुसरीकडे 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे नामांकित पुरस्कार सोहळा पार पडत आहे. त्यामुळे फिल्मफेअरची ब्लॅक लेडी कोणाकोणाच्या पदरात पडणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. यामध्येच विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' या सिनेमाने सर्वाधिक पुरस्कार पटकावल्याचं दिसून येत आहे.
विकी कौशलचा (vicky kaushal) 'सॅम बहादूर' हा सिनेमा रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) Animal या सिनेमासोबत रिलीज झाला होता. मात्र, Animal समोर हा सिनेमा फार काळ तग धरु शकला नाही. परंतु, फिल्मफेअरमध्ये या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाने सर्वाधिक पुरस्कार स्वत:च्या नावावर केले आहेत.
शाहरुख खानच्या (shahrukh khan) 'जवान' सिनेमाला बेस्ट अॅक्शन हा पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट एडिटिंग केल्यामुळे विक्रांत मेस्सीच्या '12 वी फेल' या सिनेमालाही गौरवण्यात आलं. तर दुसरीकडे 'सॅम बहादूर' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन, बेस्ट कॉस्ट्यूम, बेस्ट प्रोडक्शन डिझाइन हे तीन पुरस्कार पटकावले आहेत.
फिल्मफेयर पुरस्कार 2024 ची संपूर्ण लिस्ट:
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन - सॅम बहादूर (कुणाल शर्मा), Animal (Sync Cinema)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर - Animal (हर्षवर्धन रामेश्वर)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन - सॅम बहादूर (सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे)
सर्वोत्कृष्ट VFX- जवान (रेड चिलीज VFX)
सर्वोत्कृष्ट एडिटींग - 12वीं फेल (जसकुंवर सिंह कोहली आणि विधु विनोद चोप्रा)
सर्वोत्कृष्ट कॉस्टयूम डिजाइन - सॅम बहादुर (सचिन लवलेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - थ्री ऑफ अस (अविनाश अरुण धावरे)
सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी - WHAT JHUMKA? (गणेश आचार्य)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन - जवान (स्पायरो रजाटोस, एनल अरासु, क्रेग मॅक्रे, यानिक बेन, केचा खम्फाकडी आणि सुनील रोड्रिग्स)