ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - बॉलिवूडमध्ये सध्या जोडप्यांचे ब्रेक अप होत असल्याच्या बातम्या भरपूर प्रमाणात ऐकायला मिळत आहेत. अनेक जोडप्यांमध्ये भांडण होत आहेत. आता या भांडणामध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध जोडप्याचं नाव जोडलं गेलं आहे. बच्चन परिवारातील लव्ह बर्ड्स अर्थात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन. बॉलिवूडमधल आदर्श जोडपं म्हणून ऐश्वर्या-अभिषेक ओळखले जातात. मात्र, या दोघांमध्ये असं काही झालयं की ज्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं समोर आलं आहे. सरबजीत या सिनेमाच्या प्रिमिअरच्या ठिकणी. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन सिनेमाच्या प्रिमिअर साठी उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांच्यात काही तर बिनसलं असल्याचं दिसून आले.
ओमंग कुमार दिग्दर्शित सरबजीतच्या प्रिमिअरसाठी ऐर्श्वर्या आपले आई-वडील, सासू-सासरे भाऊ आणि पती अभिषेकसह दाखल झाली होती. या कार्यक्रमात ऐश्वर्या खूपच उस्ताहित असल्याचे पहायला मिळाले. मात्र, अभिषेक ऐश्वर्याला इग्नोर करत असल्याचे दिसला. दोघातील हा अबोला का आहे? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
ऐश्वर्या-अभिषेकचा फोटो काढण्यासाठी सर्व फोटोग्राफर्स उतावळे होते. मात्र, अभिषेक या सर्वांपासून दूर जात असल्याचे पहायला मिळाले. ऐश्वर्याने फोटो काढण्यासाठी अभिषेकला बोलावले मात्र तो आला नाही त्यानंतर मीडियाने आवाज दिल्यावर अभिषेक आला आणि काही फोटोज काढले. पण अभिषेक नाराज असल्याचे चेह-यावरुन दिसत होते. त्यानंतर अभिषेक मीडियाला म्हणाला की इन्ही की फोटो ले लो आणि तेथून निघून गेला. यानंतर ऐश्वर्याच्या चेह-यावरील रंगच उडाला. ऐश्वर्यानं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या चेहऱ्यावरून आणि तिच्या देहबोलीवरून याबद्दल नाराजी स्पष्ट दिसून आली.