Join us

VIDEO : केवळ ३ रूपये घेऊन मुंबईला आले होते देव आनंद, धर्मेंद्र यांनी शेअर केली त्यांची जुनी मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 6:35 PM

देव आनंद यांच्या मुलाखतीची एक छोटी क्लिप अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केली आहे. धर्मेंद्र यांनी देव आनंद यांची ती क्लिप शेअर करत त्यांची आठवण काढली.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद (Dev Anand) भारतातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचे सिनेमे, त्यांचा अभिनय, त्यांची स्टाइल सगळंच प्रेक्षकांना मोहिनी घालणारं होतं. गुरूदासपूरमध्ये राहणारे देव आनंद यांनी त्यांचं जीवन मुंबईत (Mumbai) सुरू केलं. त्यावेळी ते सोबत केवळ ३ रूपये घेऊन मुंबईला आले होते. त्यांनी स्वत: हे एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

याच मुलाखतीची एक छोटी क्लिप अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी शेअर केली आहे. धर्मेंद्र यांनी देव आनंद यांची ती क्लिप शेअर करत त्यांची आठवण काढली. त्यांनी लिहिलं की, 'मित्रांनो, आपल्या देव आनंद साहेबांची बोलणं हे प्रेमाने भरलेलं आहे'. या व्हिडीओत होस्ट देव आनंद यांना विचारतात की, लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही पंजाबचे आहात की लाहोरचे, मग तुम्ही पंजाबी बोलत असाल'.

यावर देव आनंद बोलतात की, 'मी  पंजाबी आहे. गुरूदासपूरचा राहणारा आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा मोठं भांडण झालं होतं. गुरूदासपूर पाकिस्तानात जाईल की भारतात. माझे वडील गुरूदासपूरमध्ये होते आणि मी मुंबईत होतो'. घरी कोणताही भाषा बोलत होते यावर ते म्हणाले की, 'पंजाबी किंवा हिंदी किंवा इंग्रजी. माझा जन्म गुरूदासपुरचा आहे. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला डलहौजीला कॉन्व्हेंटमध्ये पाठवलं. नंतर मी लाहोरमध्ये कॉलेजला गेलो. १९४३ मध्ये बीए पास केल्यावर मला एमए करायचं होतं. पण एमए करण्यासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते. तेव्हा मला अभिनेता बनण्याचा विचार आला'.

ते म्हणाले की, 'मी कुणाचं ऐकलं नाही. मग पैसे येणार कुठून. तीन रूपये घेऊन माझ्या मित्राच्या गाडीने मी मुंबईला पोहोचलो. मग अडीच वर्ष मेहनत केली. मी एका फार शानदार कॉलेजमधून आहे आणि चांगलं शिक्षण घेतलं आहे. खूपसारा कॉन्फिडन्स आहे. मला वाटतं व्यक्तीचा आत्मविश्वासच त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे'. 

टॅग्स :देव आनंदधमेंद्रसोशल व्हायरलसोशल मीडिया