अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबार येत्या २५ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या ६ दिवस आधी गौहरने आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांची लॉकडाऊनमधील स्टोरी दाखवण्यात आली आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि त्यांनी कसे प्रपोज केले हे सगळे या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. 'जब वी मेट' असे कॅप्शन देत गौहरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
गौहर खान आणि जैदचे लग्न २५ डिसेंबरला मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार पडणार आहे. नुकतीच त्यांची डिजिटल इन्विटेशन कार्ड समोर आले आहे. या व्हिडिओ दोन कॅरिकेचर्सने सुरू होतो, दोघे जणं ऑटोमधून दाखवले आहेत अर्थातच हे दोघं गौहर आणि जैद आहेत. त्यानंतर, हे दोघे शॉपिंग मॉलमध्ये वस्तू खरेदी करताना दिसतात आणि त्यानंतर दोघांनी फोनवर बोलण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमुळे दोघेही पार्किंग गॅरेजमध्ये रोमँटिक डेटवर जात असत. सोबतच या व्हिडीओमध्ये जैदने गौहरला कसे प्रपोज केले ते दाखवण्यात आले आहे. या दोघांची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे.
शुक्रवारी गौहर खान आणि जैद दरबारला मुंबईतील मनीष मल्होत्रा यांच्या शोरुमच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. हे दोघे लग्नाचे ड्रेस ट्राय करण्यासाठी शोरुममध्ये गेले होते.
गौहरने नुकतीच एक पोस्ट शेअर करुन आपल्या लग्नाची घोषणा केली. 'आम्ही लग्न करणार आहोत हे सांगून आम्हाला खूप आनंद होतोय. आताची परिस्थिती लक्षात घेता आम्ही हा मोठा दिवस आमच्या कुटुंबाच्या उपस्थितीत साजरा करणार आहोत'.
जैदच्या लग्नावर वडील इस्माईल दरबार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आम्हाला त्यांच्या नात्याबद्दल काही अडचण नाही. या नात्यास आम्ही आधीच सहमती दिली आहे. मुलांना जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत.' अद्याप जैद आणि गौहर यांनी त्यांच्या लग्नाच्या तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.