Join us

VIDEO: जॉर्जिया अँड्रियानीच्या नवीन लूकची होतेय चर्चा, स्वतःच बनली हेअर स्टायलिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:20 IST

इटालियन ब्यूटी जॉर्जिया अँड्रियानीने लॉकडाऊन दरम्यान नवीन लूक केला आहे.

लॉकडाउनमुळे सलून आणि पार्लर बंद ठेवण्यात आले होते. त्यात लॉकडाउनमध्ये काही कलाकार स्वतःच स्वतःचे केस कापले आणि मेकओव्हर केला. तर काही अभिनेत्यांची पत्नी त्यांची हेअर स्टायलिस्ट बनली. तसेच काहीसे इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी हिच्याबाबतीत झाले आहे. या लॉकडाउनमध्ये तिने स्वतःच मेकओव्हर केला आहे. त्याचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

इटालियन ब्यूटी जॉर्जिया अँड्रियानीने लॉकडाऊन दरम्यान नवीन लूक केला आहे. एक दिवस आधी जॉर्जियाने इंस्टाग्रामवर नवीन लूक बद्दल चाहत्यांचे मत घेतले होते. त्यात 66 टक्के लोकांनी नवीन लूक करावा, असे म्हटले होते. या व्हिडिओत ती स्वतःच हेअरकट करताना दिसते आहे.

जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि तिग्मांशू धूलिया मुख्य भूमिकेत आहेत.

याशिवाय अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वरियर अभिनित बहुप्रतिक्षित 'श्रीदेवी बंगल्या'मध्ये आयटम नंबर साँग करताना दिसणार आहे. 

टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान