Join us

VIDEO- "हसीना पारकर’चा ट्रेलर रिलीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 5:28 PM

सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर ट्रेलरची उत्सुकता निर्माण करणाऱ्या "हसीना पारकर" या सिनेमाचा ट्रेलर अखेरीस रिलीज झाला आहे. ‘

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18- सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर ट्रेलरची उत्सुकता निर्माण करणाऱ्या "हसीना पारकर" या सिनेमाचा ट्रेलर अखेरीस रिलीज झाला आहे. ‘मोहम्मद अली रोड का लफडा सुलझाने के लिए तुम्हे दुबई से कॉल आएगा.." असा  श्रद्धा कपूरचा आवाजातील दमदार डायलॉग ‘हसीना पारकर’ या सिनेमाच्या ट्रेलरला सुरुवात ऐकायला मिळतो आहे.  ट्रेलरच्या आधी सिनेमाचे विविध पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लूकची झलक बघायला मिळत होती. पण सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मुख्य भूमिका साकारत असलेल्या श्रद्धाचा वेगळा लूक बघायला मिळतो आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर श्रद्धाने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाबद्दलची जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे . 
 
‘आपने मेरे भाई के बारे मे पढा है…मैंने मेरे भाई को पढा है’ असा एक दमदार डायलॉगही ट्रेलरमध्ये बघायला मिळतो आहे. हसीना पारकर या भूमिकेला न्याय देण्यासाठी  श्रद्धा कपूरने घेतलेली मेहनत ट्रेलरमध्ये दिसतं आहे. ट्रेलरमध्ये बॉम्बस्फोटाचे सीन्स, श्रद्धाचा आक्रोश, दाऊदच्या बहिणीपासून ‘आपा’पर्यंतचा हसीना पारकरचा प्रवास या ट्रेलरमधून दाखवण्यात आला आहे. 
आणखी वाचा
 

बॉलिवूडमध्ये वर्णभेद? नवाजने दिले संकेत

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचा आज स्मृतिदिन

जेव्हा अप्सरा मेट बादशाह शाहरुख खान

दाऊदच्या बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कसा थांबला याचं चित्रण ‘हसीना पारकर" या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमातून गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूर झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर सिनेमात श्रद्धाच्या पतीच्या म्हणजेच इब्राहिमच्या भूमिकतेत अभिनेता अंकुर भाटिया झळकणार आहे. 18 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. विशेष म्हणजे सिनेमाची टॅगलाइनही सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. ‘अठ्ठासी केसेस दर्ज, पर कोर्टमे हाजरी सिर्फ एक बार’ ही टॅगलाइन अनेकांनी शेअरही करत सिनेमाबद्दलची उत्सुकताही व्यक्त केली.