बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यात सैफ आणि करीना एकमेकांबद्दल बोलत आहेत. अशात सैफला एक प्रश्न विचारला गेला. ज्याचे उत्तर ऐकून करीनाही लाजली.
या व्हिडिओत सैफला विचारलं की, झोपण्यापूर्वी करीना शेवटचं काय काम करते. त्याने आधी थोडा विचार केला नंतर करिनाने इशारा केल्यानंतर तो म्हणाला, ती झोपण्यापूर्वी टीव्ही पाहते.' नंतर पुन्हा हसत हसत मोठ्या चलाखीने तो म्हणाला, 'झोपण्यापूर्वी करीना शेवटचे काम काय करते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.' सैफच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकताना दिसतो आहे. करीनाही लाजरीबुजरी होताना दिसत आहे. सैफ आणि करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसतो आहे.