Join us

Video : साजिदने केले लैंगिक शोषण; अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला खळबळजनक आरोप 

By पूनम अपराज | Updated: January 22, 2021 15:06 IST

Sexual Harrasment : शर्लिनने सांगितलं की, एका मुलाखतीत साजिद खानने तिच्याशी कशी वर्तणूक केली होती. सहा वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेबाबत शर्लिन सांगत आहे. 

ठळक मुद्देजिया खानची बहिण करिश्मा असे आरोप करणारी सातवी महिला आहे. अशातच आता शर्लिन चोप्राच्या नावाची भर पडली आहे.

फिल्ममेकर साजिद खानवर एका मागोमाग एक लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात येत आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानही पुन्हा चर्चेत आला आहे. आता लैंगिक शोषणाचे आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्राने लावले आहेत. शर्लिनने आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ट्विटर या सोशल मीडियाची मदत घेतली आहे. शर्लिनने सांगितलं की, एका मुलाखतीत साजिद खानने तिच्याशी कशी वर्तणूक केली होती. सहा वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेबाबत शर्लिन सांगत आहे. 

शर्लिन चोप्राने ट्विटमध्ये म्हटलंय की, जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर एप्रिल २०१५ मध्ये साजिद यांना भेटली, तेव्हा त्यांनी आपल्यासमोर अत्यंत किळसवाणा प्रकार केला. 'शर्लिनने ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओतून भावुक होऊन म्हटलं की, मी बॉलीवूडला खूप जवळून पाहिलं आहे. जाणलं आणि समजलं ही आहे. आता या निष्कर्षापर्यंत पोहचले आहे की, बाहेर डिप्रेशनचे नारे लावतात. डिप्रेशन हा रोग आहे म्हणतात. बंद खोलीत मालचे सेवन करतात. बाहेर कौटुंबिक भावना व्यक्त करतात. बंद खोली गुप्तांग दाखवतात. या अशा बॉलिवूडपासून आता मी दूर आहे.

अभिनेत्री जिया खानच्या बहिणीने लावले गंभीर आरोप 

अभिनेत्री जिया खानची बहिण करिश्माने अनेक खुलासे केले आहेत. बीबीसीच्या मुलाखतीत जियाच्या बहिणीने दिग्दर्शक साजिद खानने शारीरिक शोषण केलं होतं. साजिद खानने अभिनेत्रीला टॉपलेस होण्यास सांगितलं होतं. साजिद खानवर या अगोदरही शारीरिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. जिया खानची बहिण करिश्मा असे आरोप करणारी सातवी महिला आहे. अशातच आता शर्लिन चोप्राच्या नावाची भर पडली आहे.

टॅग्स :साजिद खानलैंगिक छळलैंगिक शोषणबॉलिवूडशर्लिन चोप्रा