ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि. 1- बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते अगदी काहीही करू शकतात, याचीच प्रचिती आली आहे, मालेगावातील उपकार थिएटरमध्ये. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमामध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. ज्यावेळी सिनेमामध्ये शाहरुखची एन्ट्री झाली त्यावेळी उपकार थिएटरमध्ये त्याच्या चाहत्यांनी चक्क फटाके फोडून आनंद साजरा केला.
शाहरुखच्या 'एक तरफा प्यार की ताकद' या डायलॉगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा उपकार थिएटरमधील त्याचे चाहते भलतेच खूश झाले. शाहरुखला पाहून त्याचे चाहते इतके खूश झाले की आनंदाच्या भरात त्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
This looks like a Terrorist strike, but is actually the people of Malegaon celebrating SRK's entry in ADHM pic.twitter.com/J2uO9Jaqj8— Gabbbar (@GabbbarSingh) October 31, 2016
ज्यावेळी फटाके फोडण्यात आले तेव्हा थिएटरमध्ये 900 प्रेक्षक उपस्थित होते. फटके फोडल्याने थिएटरचा काही भागदेखील जळाल्याचीही माहिती समोर आली आहे. तसंच शाहरुखच्या चाहत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे सिनेमाचा खेळ काही वेळासाठी थांबवण्यात देखील आला होता, अशी माहिती थिएटरच्या मालकाने दिली. दहा मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू करण्यात आला मात्र तोपर्यंत 400 जण थिएटरबाहेर पडली होती. दरम्यान थिएटरमध्ये फटाके फोडल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.