मुंबई - मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या प्रखर अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटातील तिच्या कामाचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होते. आता, सोनालीने वेबसिरीजच्या माध्यमातूनही चित्रपटसृष्टीत एंट्री केली आहे. विसलब्लोअर या वेबसिरीजमध्ये सोनाली, भाजपुरी स्टार आणि खासदार रविकिशनसोबत झळकली आहे. या सिरीजमध्ये रविकिशन, सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सोनालीने या बेवसिरीजमधील इंटीमेट सीनबद्दल द कपिल शर्मा शोमध्ये किस्सा शेअर केला आहे.
‘whistleblower' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी यी सिरीजची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. त्यावेळी, वेबसिरीजसाठी कास्टींग आणि इंटीमेट सीनबाबतचा एक किस्सा सोनालीने शेअर केला. सोनालीने बिनधास्तपणे पलंग तोड दो... असे म्हणत या सीनबद्दल सांगतिले. त्यावेळी, रवि किशनही लाजला होता. सोनालीने वेबसिरीजमध्ये रविकिशन यांच्या पत्नीची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच, सीरजमध्ये दोघांचेही रोमॅन्टीक सीन आहेत. याबाबतच शोमध्ये जाहीरपणे चर्चा झाली.