Join us  

VIDEO : विकी कौशलने कतरिना कैफला घातली लग्नाची मागणी, त्यावर सलमान खानने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 1:25 PM

विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे.

एकेकाळी बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या अफेयरची चर्चा होती. कतरिना कैफचे नाव रणबीर कपूरसोबतही चर्चेत होते. मात्र आता ती उरी फेम अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये ते दोघे एकत्र पाहायला मिळतात. मात्र त्या दोघांनी कधीच रिलेशनशीपमध्ये असल्याची कबूली दिली नाही. दरम्यान आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत विकी कौशल कतरिना कैफला लग्नाची मागणी घालताना दिसतो आहे. त्यानंतर कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानची देखील रिएक्शन समोर आली आहे.

सलमान खानचे चाहते त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सलमान खानचे बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्यात अभिनेत्री कतरिना कैफचाही समावेश आहे. मात्र भाईजानने लग्नाची मागणी घालण्याआधीच विकी कौशलने बाजी मारली आहे. हा सगळा प्रकार घडलाय तो एका पुरस्कार सोहळ्यात. या सोहळ्यातील विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओत विकी कौशल कतरिना कैफला म्हणतोय की सध्या लग्नसराई आहे त्यामुळे मला विचारावेसे वाटतेय. त्यावर कतरिना कैफ म्हणाली काय? त्यावर विकीने म्हटले मुझसे शादी करोगी?...' 

यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सलमान खानने बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर डोक ठेकवले. विक्कीच्या मागणीवर कतरीना म्हणते, 'माझ्यात हिंमत नाही.' कतरिनाचे हे उत्तर ऐकून सलमान अवाक होऊन स्टेजकडे पाहताना दिसतो आहे. 

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफविकी कौशल