Next

VIDEO : जयललितांनी धर्मेंद्र यांच्यासोबत केलेला एकमेव हिंदी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2016 06:09 PM2016-12-06T18:09:22+5:302016-12-07T11:53:06+5:30

आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी सिनेसृष्टीतही आपली वेगळी छाप पाडली होती. तामिळ आणि तेलगू सिनेमा गाजवणा-या जे. जयललिता यांची मोहिनी हिंदी सिनेमातही पाहायला मिळाली. 1968 साली रिलीज झालेल्या 'इज्जत' या एकमेव हिंदी सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्रीचे काम केले. 'इज्जत'मध्ये बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा डबल रोल पाहायला मिळाला होता. शिवाय सिनेमामध्ये तनुजा, मेहमूद यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या सिनेमातील जयललिता यांच्यावर चित्रित करण्यात आलेले 'जागी बदन मे ज्वाला' हे गाणं तर प्रचंड गाजले होते. सौंदर्य, अभिनय इतकेच नाही तर आपल्या नृत्याच्या मनमोहक अंदांनी जयललिता यांनी हिंदी सिनेरसिकांनाही स्वतःच्या अभिनयाची एकेकाळी भुरळ पाडली होती.

आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी सिनेसृष्टीतही आपली वेगळी छाप पाडली होती. तामिळ आणि तेलगू सिनेमा गाजवणा-या जे. जयललिता यांची मोहिनी हिंदी सिनेमातही पाहायला मिळाली. 1968 साली रिलीज झालेल्या 'इज्जत' या एकमेव हिंदी सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्रीचे काम केले. 'इज्जत'मध्ये बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा डबल रोल पाहायला मिळाला होता. शिवाय सिनेमामध्ये तनुजा, मेहमूद यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या सिनेमातील जयललिता यांच्यावर चित्रित करण्यात आलेले 'जागी बदन मे ज्वाला' हे गाणं तर प्रचंड गाजले होते. सौंदर्य, अभिनय इतकेच नाही तर आपल्या नृत्याच्या मनमोहक अंदांनी जयललिता यांनी हिंदी सिनेरसिकांनाही स्वतःच्या अभिनयाची एकेकाळी भुरळ पाडली होती.आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी सिनेसृष्टीतही आपली वेगळी छाप पाडली होती. तामिळ आणि तेलगू सिनेमा गाजवणा-या जे. जयललिता यांची मोहिनी हिंदी सिनेमातही पाहायला मिळाली. 1968 साली रिलीज झालेल्या 'इज्जत' या एकमेव हिंदी सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्रीचे काम केले. 'इज्जत'मध्ये बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा डबल रोल पाहायला मिळाला होता. शिवाय सिनेमामध्ये तनुजा, मेहमूद यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या सिनेमातील जयललिता यांच्यावर चित्रित करण्यात आलेले 'जागी बदन मे ज्वाला' हे गाणं तर प्रचंड गाजले होते. सौंदर्य, अभिनय इतकेच नाही तर आपल्या नृत्याच्या मनमोहक अंदांनी जयललिता यांनी हिंदी सिनेरसिकांनाही स्वतःच्या अभिनयाची एकेकाळी भुरळ पाडली होती.