ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - जागतिक महासत्ता अशी बिरूदावली मिरवणा-या अमेरिकेच्या ४५ व्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कोण विराजमान होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. थोड्याच वेळात मतदानाचा निकाल लागणार असून या निवडणुकीचे पडसाद भारतात उमटत असून जनसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड कलाकारांनीही आपले मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने ट्विटर अकाऊंटवरून हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दर्शवला होता. तर काल नामवंत अभिनेत्री विद्या बालननेही हिलरी यांना पाठिंबा देणारे ट्विट केले आहे, मात्र याच ट्विटमधील चुकीमुळे ती अडचणीत सापडली आहे.
‘मला असं वाटतं की, उद्या हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्रपती व्हाव्यात’, असे ट्विट विद्याने केले होते. विद्याच्या या ट्विटमध्ये 'पहिली महिला राष्ट्रपती' असा उल्लेख राहिल्याने नेटीझन्सनी विद्याची चूक हेरून लगेच ती लक्षात आणून दिली.
And all i want to see is Hillary Clinton becoming the 1st President of the United States 2mrw..