Join us  

विद्या बालनचा 'बेगम' अवतार, पोस्टर रिलीज

By admin | Published: March 07, 2017 11:18 AM

अभिनेत्री विद्या बालनने तिचा आगामी चित्रपट 'बेगम जान'चा पोस्टर रिलीज केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - अभिनेत्री विद्या बालनने तिचा आगामी चित्रपट 'बेगम जान'चा पोस्टर रिलीज केला आहे. नेहमी आव्हानात्मक भूमिका स्विकारणा-या विद्या बालनचा हटके लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटात विद्या बालन कुंटणखान्याच्या प्रमुख बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरवरुन तरी विद्या बालनने भूमिकेला अत्यंत योग्य न्याय दिल्याचं दिसत आहे. 
 
‘बेगम जान’ हा चित्रपट ‘राज काहिणी’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे. ‘राज काहिणी’ हा चित्रपट श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील बेगम जानची भूमिका रितूपर्णा सेनगुप्ताने साकारली होती. महेश भट आणि मुकेश भट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 
 
हा चित्रपट कुंटणखान्याच्या अवतीभवती फिरताना दिसणार आहे. भारत - पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळची कथा चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. विद्या बालनव्यतिरिक्त गौहर खान आणि नसीरुद्दून शाह चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. 
 
काही दिवसांपुर्वी चित्रपटातील चित्रिकरणाच्या वेळचाएक फोटो समोर आला होता. फोटोमध्ये हुक्का ओढत पलंगवर झोपलेली दिसत होती. गौहर खानही या फोटोत दिसत होती, ज्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्याच्या या चित्रपटाला सेन्सोर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र दिल्याचे समजते. या चित्रपटातील काही शब्दांवर देखील सेन्सोर बोर्डाने आक्षेप घेतला असून ते शब्द चित्रपटातून हटविण्यास सांगितले आहे. 14 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.