अभिनेता विद्युत जामवाल(Vidyut Jammwal) बॉलिवूडमध्ये त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वत: स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. लवकरच अभिनेत्याचे अनेक सिनेमा रिलीज होणार आहेत. याचदरम्यान विद्युतचं फॅशन डिझाईनर नंदिता मेहतानीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. दोघांनी दोनवर्षांपूर्वी सारखपुडा केला होता ज्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.
दोन वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा विद्युत जामवालने २०२१ साली आग्रा ताजमहालमध्ये नंदिता महतानीसोबत एंगेजमेंट केली होती. नंदिताने घटस्फोट घेतला आहे आणि विद्युतसोबत दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. विद्युत आणि नंदिता लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण आता त्यांच्या विभक्त होण्याच्या या बातमीने चाहते नाराज झाले आहेत.
नंदिताच्या आधी विद्युत आधी मोना सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2 वर्षे दोघांचे अफेअर सुरू होते. विद्युतशी घटस्फोट झाल्यानंतर मोनाने बिझनेसमॅन श्याम गोपालनसोबत लग्न केले.
कोण आहे नंदिता माहतानी?नंदिता माहतानी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे. विशेष म्हणजे, नंदिता ही करिश्मा कपूरचा एक्स- हसबण्ड संजय कपूरची पहिली पत्नी आहे. नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर संजयने करिश्माशी लग्न केले. संजय कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर नंदिता काळी काळ अभिनेता डिनो मोरियासोबतही रिलेशनशिपमध्ये होती. मात्र कालांतराने त्यांचं ब्रेकअप झालं.