Join us

अभिज्ञा भावेची ही व्यक्तिरेखा भावतेय प्रेक्षकांना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 1970 6:03 AM

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे

ठळक मुद्देमोनिकानंतर आता मायरा अभिज्ञाला साकारायला मिळाली

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे.

आजकाल मालिकांमध्ये नायिके इतकीच महत्व खलनायिकांना प्राप्त झालंय. खलनायिकेला देखील तितकीच लोकप्रियता मिळतेय. विक्रांत आणि ईशा व्यतिरिक्त या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत दिसणारी मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे ही देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. याआधी देखील अभिज्ञाने मोनिका ही खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती आणि ती प्रचंड गाजली होती. मोनिकानंतर आता मायरा अभिज्ञाला साकारायला मिळाली आणि पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर खलनायिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्याची संधी अभिज्ञाला मिळाली. प्रेक्षक जितकं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात तितकंच तिच्या व्यक्तिरेखेचा रागराग देखील करतात. तिला प्रेक्षकांकडून मायरा या व्यक्तिरेखेसाठी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या कामाची प्रेक्षक अगदी आपुलकीने दाखल घेत आहेत त्यामुळे अभिज्ञा देखील खूप खुश आहे.

तिला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अभिज्ञा म्हणाली, "खलनायिका साकारत असल्यापासून सोशल मीडियावर माझ्या फॉलोवर्सची संख्या प्रचंड वाढली आहे. अर्थात कधी कधी प्रेक्षक आणि फॉलोवर्स काही थक्क करणाऱ्या प्रतिक्रिया देखील देतात. झी मराठी अवॉर्ड्ससाठी प्रेक्षक व चाहते व्होट करतात. 'मला आणि माझ्या कुटुंबाला तू आवडत नसल्याने आम्ही तुला मत देणार नाही' अशी प्रतिक्रिया देखील मला आली. हे सर्व मायबाप प्रेक्षकांचं प्रेमच आहे आणि त्यातूनच माझ्या कामाची पावती मला मिळते. भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील फरक दाखवण्यासाठी मी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते." 

टॅग्स :अभिज्ञा भावेतुला पाहते रे