अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा काल्पनिक कथेवरील वास्तवदर्शी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे अभिनेते उपेंद्र लिमये या चित्रपटात एका राकट, कणखर पोलीसा अधिकाऱ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, इतकेच नव्हे तर त्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात रहातील असा न्याय दिला.‘पेज-३’ या हिंदी चित्रपटात त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती, मात्र आता ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये साकारलेला तरुण, तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या अंदाज प्रेक्षकांना भावाला आहे. हा पोलिस अधिकारी अतिशय बाणेदार आहे, या भूमिकेला धारदार संवादाची जोड असल्याने सामान्य प्रेक्षक त्यांच्या भूमिकेला दाद देतात, मुख्य भूमिकेतील ओम भूतकर यांच्या सोबतच्या जुगलाबंदीचीही चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. उपेंद्र लिमये यांनी आपल्या भूमिकेतून नवा ‘खाकी पॅटर्न’, ‘पोलिस पॅटर्न’ निर्माण केल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे ‘मुळशी पॅटर्न’च्या शोची संख्या सर्वत्र वाढली आहे.
चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत.