गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की साऊथचा स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये लवकरच डेब्यू करणार आहे. विजय देवरकोंडा दुसऱ्या तिसऱ्या सिनेमातून नाही तर रणवीर सिंगसोबत '८३'सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतोय. हा सिनेमा १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे. यात रणवीर सिंगकपिल देव यांनी भूमिका साकारणार आहे.
या सिनेमात क्रिकेटर श्रीकांतची भूमिका विजय देवरकोंडा साकारणार होता. मात्र बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार विजयने ही भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. सध्या तो आपल्या तेलुगू सिनेमच्या प्रोजेक्टसमध्ये बिझी आहे. विजय हिंदीमध्ये डेब्यू करण्याच्या विचारात आहे मात्र तो '८३' हा सिनेमा नाही ज्यात रणवीर सिंगची महत्त्वाची भूमिका आहे. विजयला असा सिनेमा हवा ज्यात तिची भूमिका मुख्य असेल. त्यामुळ तूर्तास तरी विजय याच्या बॉलिवूड डेब्यूवर पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'८३' बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच रणवीर या सिनेमासाठी कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.