Join us

Vijay Deverakonda: हे सगळे लोकप्रियतेचे साईड इफेक्ट..., EDच्या चौकशीनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 4:35 PM

Liger, Vijay Deverakonda: काल बुधवारी विजय देवरकोंडा EDसमोर हजर झाला. तब्बल 12 तास त्याची चौशी झाली. ईडीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यावर विजयची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. त्याने ती दिली.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने ( Vijay Deverakonda) यावर्षी ‘लाइगर’ (Liger )या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र याच चित्रपटामुळे तो सध्या अडचणीत सापडला आहे. ‘लाइगर’च्या फंडिंगवरून ईडीने समन्स बजावला आणि काल बुधवारी विजय देवरकोंडा EDसमोर हजर झाला. तब्बल 12 तास त्याची चौशी झाली. ईडीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यावर विजयची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. त्याने ती दिली.

ईडीच्या चौकशीनंतर विजय देवरकोंडाने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. यात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकप्रियता मिळाल्याचे काही साईड इफेक्टही आणि चिंताही असतात.  त्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. मी याला एक अनुभव म्हणून बघतो. हेच आयुष्य आहे. त्यांनी मला चौकशीसाठी बोलावलं आणि मी माझं कर्तव्य बजावलं. मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत. त्यांनी मला पुन्हा बोलावलेलं नाही,’ असं या स्टेटमेंटमध्ये विजय देवरकोंडाने म्हटलं आहे.

‘लाइगर’ या चित्रपटासाठी काळ्या धनाचा वापर झाल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी ईडीने चित्रपटाशी संबंधित पैशांच्या स्रोतांची चौकशी सुरू केली आहे.  ईडीने अलीकडेच सिनेमाचा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि त्यांची व्यावसायिक भागीदार चार्मी कौर यांची जवळपास 12 तास चौकशी केली होती. आज विजय देवरकोंडाही ईडीसमोर हजर झाला.  येत्या दिवसांत  माइक टायसन व इतर कलाकारांचीही याप्रकरणी चौकशी होणार असल्याचं कळतंय.

 ‘लाइगर’मध्ये विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, राम्या कृष्णन आणि माइक टायसन यांनी  मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 25 ऑगस्ट 2022 रोजी पाच भाषांमध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. ‘लाइगर’  स्पोर्ट्स ड्रामा होता.  सिनेमाचं बरचंस शूटिंग यूएसमध्ये लास वेगास याठिकाणी झालं होतं. या शूटिंग शेड्युलचा बजेट जवळपास 125 कोटी होता. सिनेमाचं देशभरात जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. 

टॅग्स :विजय देवरकोंडाअंमलबजावणी संचालनालयTollywood