Join us  

विजय कदम यांची आफ्रिकावारी

By admin | Published: October 16, 2016 3:01 AM

विजय कदम यांना आपण मराठी चित्रपटांमध्ये; तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये विनोद करताना पाहिले आहे. आपल्या सहजसुंदर विनोदांनी त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसवले आहे.

विजय कदम यांना आपण मराठी चित्रपटांमध्ये; तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये विनोद करताना पाहिले आहे. आपल्या सहजसुंदर विनोदांनी त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसवले आहे. महाराष्ट्राचे बहुरंगी, बहुढंगी लोकप्रिय कलाकार विजय कदम त्यांच्या खुमखुमी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. खुमखुमी हा त्यांचा महाराष्ट्रात गाजलेला विनोदी कार्यक्रम आता जोहान्सबर्गमध्ये सादर करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका मराठी मंडळाच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन द मार्केट लॅब्रोटरी थिएटर येथे करण्यात आले आहे. निखळ हास्याची मेजवानी असणाऱ्या विजय कदम यांच्या आगळ्या वेगळ्या खुमखुमी या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली असून, दक्षिण आफ्रिकेतील तमाम मराठी रसिकजन या रंगतदार मराठमोळ्या कार्यक्रमाला तितकीच पसंती देतील, असा विश्वास या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला आहे. या वेळी विजय कदम यांच्यासोबत कवी, लेखक आणि नाटककार मोहन भोईर सहभागी होणार आहेत.