Join us

IC 814 The Kandahar Hijack : 'कंदहार विमान अपहरण' घटनेवर आधारित सिरीज कधी अन् कुठे पाहता येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 1:10 PM

कंदहार विमान अपहरण ही घटना भारतीय इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

IC 814 The Kandahar Hijack Teaser: २५ वर्षांपूर्वी संपूर्ण भारत हादरला होता. २४ डिसेंबर १९९९ रोजी दहशतवाद्यांनी काठमांडूहून नेपाळला येणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण केलं. दहशतवादी एवढं मोठं कृत्य करु शकतात याचा भारत सरकारला अंदाजही नव्हता. विमानात एकूण 180 प्रवासी होते.  विमानाच्या बदल्यात तत्कालीन वाजपेयी सरकारला दहशतवाद्यांसमोर नांगी टाकावी लागली होती आणि तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं होतं. या सत्य घटनेवर एक सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. तिचं नाव IC 814- The Kandahar Hijack. तर ही सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार हे आपण जाणून घेऊया. 

उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेले विजय वर्मा आणि नसीरुद्दीन शाह यांची वेब सिरीज IC 814- The Kandahar Hijack सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. निर्मात्यांनी या सिरीजचा दमदार टीझर रिलीज केला आहे. या सिरीजची कथा विमानात आणि विमानाबाहेर काय घडले याभोवती फिरते. 

यासोबतच अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिरीजची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ही सिरीज 29 ऑगस्ट 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. वेब सिरीजची स्टारकास्ट जोरदार आहे. यात विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा आणि कुमुद मिश्रा सारखे दिग्गज कलाकार आहेत.

कंदहार विमान अपहरण ही घटना भारतीय इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे दहशतवादी कोणत्या थराला जाऊ शकतात आणि भारतीय सुरक्षाव्यवस्था कशी भेदू शकतात याची प्रचिती आली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीतील हा सर्वात कठीण प्रसंग मानला जातो. 

टॅग्स :नेटफ्लिक्सबॉलिवूडसेलिब्रिटीनसिरुद्दीन शाह